Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड महापालिकेचा २१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प; आयुक्त शेखर सिंह करणार सादर

पिंपरी चिंचवड महापालिकेचा २१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प; आयुक्त शेखर सिंह करणार सादर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिकवर्षांचा अर्थसंकल्प शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून स्थायी समितीला सादर करण्यात येणार आहे. महापालिकेचा ४३ वा अर्थसंकल्प असून सलग तिसऱ्या वर्षीही प्रशासकांकडूनच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात शहरवासीयांसाठी कोणत्या योजना, प्रकल्प असणार याची नागरिकांना उत्सुकता लागून आहे.

महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून २०२५-२६ चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी विविध कामे, तरतुदींबाबत विभागनिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. यंदाचा ई-अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पात केंद्र शासनाच्या पुरस्कृत विविध योजना, विविध विकासकामे, आरोग्य, प्रशासकीय सुविधा, स्थापत्यविषयक कामे, शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, तसेच विविध विकासकामांसाठी अत्यावश्यक निधी, महसूल, तरतुदी आदी बाबींचा तपशील देण्यात येणार आहे.

हवामान अर्थसंकल्पाचाही असणार समावेश

वातावरणातील बदलामुळे नागरिक तसेच, प्राणी, पक्षी व निसर्गावर विपरित परिणाम होत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात हवामान अर्थसंकल्पाचा समावेश केला जाणार आहे. शहराची हवा स्वच्छ राहण्यासाठी त्यासाठी विविध कामांचा समावेश असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments