Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड पोलिसांनी केली कारवाईः नाकाबंदीत पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से...

पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली कारवाईः नाकाबंदीत पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्यावर 50 लाखांची रोकड जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी-चिंचवड पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका जीप मध्ये ५० लाख रुपयांची रोकड मिळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने सदर रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोग, पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. मावळ लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मंगळवारी (२६ मार्च) नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मध्ये ५० लाख रुपये रोख रक्कम मिळून आली.

पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून पैशांच्या गैरप्रकारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments