Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड पोलिसांची कामगिरीः बोगस पोलिस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र बनवणाऱ्या वाईच्या आरोपीला...

पिंपरी चिंचवड पोलिसांची कामगिरीः बोगस पोलिस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र बनवणाऱ्या वाईच्या आरोपीला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विविध कामासाठी पोलिस चरित्र पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून पोलीस चरित्र पडताळणीची 51 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आलेले आहे. गणेश संजय कुंजकर (वय 24, रा. बेघरवस्ती, भुईंज, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात सुलभ कॉलनी येथे एक तरुण पोलीस चरित्र पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून ते नागरिकांना परस्पर देऊन त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे यांना मिळाली होती.

त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार मनोजकुमार कमले, बाळु कोकाटे, विशाल भोईर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एक व्यक्ती हा एका रुममध्ये लॅपटॉप व इतर साहीत्याचे आधारे खाजगी कंपनीमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेले बनावट पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र तयार करीत असतांना मिळून आला.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तरुणाकडून 40 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच पोलीस चरित्र पडताळणीची 51 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचेकडे अधिक चौकशी करता तो सुमारे एक वर्षापासुन पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांचे नावे बनावट पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र तयार करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments