Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजपिंपरी-चिंचवड : नवी सांगवीत गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून; दोन हल्लेखोरांनी केली...

पिंपरी-चिंचवड : नवी सांगवीत गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून; दोन हल्लेखोरांनी केली तरुणाची हत्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी चिंचवड : येथील नवी सांगवी येथे पोलिस ठाण्याच्या जवळ एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी एका तरूणावर गोळीबार केला. दीपक कदम (वय अंदाजे 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणा-या माहेश्वरी चौकातील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. दिपक कदमच्या छातीवर आणि मानेच्या बाजूला दोन गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन गोळ्या झाडून पळ काढला. आरोपीचा शोध सुरू आहे. दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सांगवी पोलीसांनी फरार आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे काम हाती घेतले आणि एका संशयिताला ताब्यातही घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments