Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

पिंपरी चिंचवडमध्ये होणार शरद पवार गटाचे कार्यालय!

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी लक्ष घातले आहे. आज त्यांची पहिली पत्रकार परिषद होत आहे. शहरांमध्ये आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीची ही दोन कार्यालय होणार आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजकारणामध्ये पवार कुटुंबाचे योगदान, महत्त्व मोलाचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी- चिंचवड शहराची ओळख आहे. याच पिंपरी- चिंचवड शहरात आता राष्ट्रवादीची दोन कार्यालये झाली आहेत. याआधी पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाने नव्याने पक्ष कार्यालय उभारलं असून काही दिवसांमध्येच त्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट !

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं बघायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड शहर हे शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेल्या विकासामुळे ओळखले जाते. गेल्या ३० वर्षांमध्ये शरद पवार यांनी सत्तेची सुत्रे अजित पवार यांच्याकडे सोपवली होती. मात्र, दोन महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्याने शरद पवार यांनी पुन्हा या गडावर लक्ष केंद्रीत केले आहे. सत्तेची सूत्र नातू रोहित पवार यांच्याकडे सोपवल्याची दिसून येत आहे.

नवीन कार्यालयाचा शोध !

एक वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन कार्यालय निर्माण करण्यात आली. त्यानंतर आता शहरामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन कार्यलये होणार आहेत. मोरवाडीत असणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता शरद पवार राष्ट्रवादी गटाला दुसरीकडे कार्यालय शोधावा लागणार आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments