Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशतः वाईन शॉपच्या मालकावर कोयत्याने सपासप वार, दगडाने...

पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशतः वाईन शॉपच्या मालकावर कोयत्याने सपासप वार, दगडाने डोके फोडले, घटना CCTV मध्ये कैद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात धक्कादायक रविवारी दुपारी धक्कादायक घटना समोर आली.

वाईन शॉपवर झालेल्या किरकोळ वादातून दुकान मालकावर एकाने धारदार कोयत्यानं सपासप वार केले आहे. तसंच त्याच्यावर दगडाने देखील हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत वाईन शॉपचा मालक गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहे. ही घटना आज रविवारी दुपारी घडली.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चिंचवड परिसरामध्ये असलेल्या वाईन्स शॉपी या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील कैद झाली आहेत. वाईन शॉपमध्ये बील घेण्याच्या वादातून स्थानिक गावगुंड आणि वाईन शॉप मालक यांच्यामध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर ही घटना घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments