Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगाराचा येरवडा कारागृहातच खून; ४ सराईतांकडून कात्रीने हल्ला

पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगाराचा येरवडा कारागृहातच खून; ४ सराईतांकडून कात्रीने हल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : कारागृहात असलेला पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवे याच्यावर कात्रीने हल्ला करण्यात आला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारागृहात असलेल्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येरवडा कारागृहात सर्कल क्र. दोनमधील बरॅक क्रमांक एकच्या आवारामध्ये गुरुवारी (दि. २८) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून कारागृहात घडलेल्या या खून प्रकरणाने खळबळ उडाली.

महेश महादेव चंदनशिवे (३१, रा. घरकुल, चिखली), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली), महेश तुकाराम माने (२४), गणेश हनुमंत मोटे (२४, दोघेही रा. सांगवी), आदित्य संभाजी मुरे, अशी संशयितांची नावे आहेत.

दरोड्याची तयारी करणे आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २०२२ मध्ये महेश चंदनशिवे याच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो गेल्या वर्षभरापासून कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पूर्ववैमनस्यातून चौघा संशयितांनी महेश चंदनशिवे याच्यावर केस कापायच्या कात्रीने व दरवाजाच्या बिजागिरीचा तुकड्याच्या सहाय्याने मानेवर व पोटाच्या बाजूला मारून हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने चंदनशिवे याला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पिंपरी, चिखली, भोसरीत गुन्हे दाखल

मृत महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलिस ठाण्यांमध्ये २०१३ ते २०२२ या कालावधीत १२ गुन्हे दाखल करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्निशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दरोडा घालणे, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महेश चंदनशिवे हा ३० नोव्हेंबर २०२२ पासून येरवडा कारागृहात सर्कल क्रमांक दोन, बरॅक क्रमांक एकमध्ये बंदीस होता.

मोक्का’तील गुन्हेगारांनी केला खून

सांगवी येथील गणेश मोटे याची गुन्हेगारी टोळी आहे. तो टोळीचा प्रमुख असून, महेश माने हा टोळीतील सदस्य आहे. मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आहेत. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्यावर ‘मोक्का’तर्गत कारवाई करण्यात आली. ‘मोक्कां’तर्गत ते कारागृहात आहेत. तर अनिकेत समदूर (२३, रा. घरकुल, चिखली) हा पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२२ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments