इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन महाविद्यालयीन युवक मुळशी धरण परिसरात बुडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिश राऊत व विशाल राठोड अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडालेल्या या युवकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे..
चाचिवली-ढोकळवाडी परिसरात दोन्ही युवक धरणाच्या पाणलोटात पोहण्यासाठी उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज दोघांनाही आला नसल्यानं अनिश आणि विशाल बुडाले.. या घटनेची माहिती त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रांनी ग्रामस्थांना दिली,. त्यानंतर पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक योगेश जाधव, हिंजवडीतील पाणबुड्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि ग्रामस्थांनी तातडीने बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. अद्यापही पोलिसांकडून त्या युवकांचा शोध सुरू आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, अनिश, विशाल हे एका महाविद्यलयात शिक्षण घेत आहेत. रविवारी अनिश, विशाल, त्यांचे मित्र गोविंद चाकली, जीत लोंढे, अथर्व राऊत, राज यादव, सोहम जाधव, आदित्य बाबर हे रविवारी सकाळी मुळशी धरण परिसरात फिरायला आले होते.
पिंपरी येथील 18 वर्षीय अनिश राऊत तर चिंचवड येथील 17 वर्षीय, विशाल राठोड यांच्या बुडालेल्या घटनेने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे..