Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पाषाणमधील गुंडावर एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

पाषाणमधील गुंडावर एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः औध, बाणेर, पाषाण, बाणेर परिसरात दहशत निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अट्टल गुंडाला पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए अन्वये कारवाई करुन स्थानबद्ध केले आहे.

आदित्य ऊर्फ राज कुमार मानवतकर (वय २०, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) असे या गुंडाचे नाव आहे. त्याची एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आदित्य मानवतकर याच्याविरुद्ध गेल्या ५ वर्षात ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, पिस्तुल अशा घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. चतुः श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एम पी डी ए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन मानवतकर याला एक वषार्साठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ६८ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments