Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजपालघरमध्ये उपचारासाठी आलेल्या वृद्ध दाम्पत्यांला डॉक्टरांच्या कारने उडवलं, महिलेचा जागीच मृत्यू

पालघरमध्ये उपचारासाठी आलेल्या वृद्ध दाम्पत्यांला डॉक्टरांच्या कारने उडवलं, महिलेचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे पतीच्या उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला डॉक्टरने आपल्या गाडीने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छायालता विश्वनाथ आरेकर (वय 73) असं मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती विश्वनाथ आरेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान घडली. पतीच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या आरेकर नाश्त्याआधीची रक्तचाचणी पूर्ण करून नाश्त्यानंतर पुन्हा तपासणीसाठी जायचे असल्याने बागेत फेरफटका मारण्यासाठी निघाल्या असता समोरून आलेल्या लाल कलरच्या गाडीने त्यांना जोरदार ठोकर देऊन फरपटत नेले. यावेळी त्यांच्या अंगावरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही गाडी डॉक्टर ए. के. दास यांची होती. त्यांचे हातून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉ. ए. के. दास यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती तारापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी दिली आहे. तसेच डॉक्टरची गाडीही जप्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments