Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजपालकांविरुद्ध गुन्हा दाखलः अल्पवयीन मुलाच्या हातात दुचाकी देणे पालकांना पडले महागात

पालकांविरुद्ध गुन्हा दाखलः अल्पवयीन मुलाच्या हातात दुचाकी देणे पालकांना पडले महागात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

अल्पवयीन मुलाला दुचाकी चाविण्यासाठी देणे हे पालकांना चांगलेच महागात पडले आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्या बद्दल मोटर वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

धूलिवंदनच्या दिवशी अनेक ठिकाणी मद्यपान करून अनेकजण वाहने चालवत असतात. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सूचना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड कॉलेज येथील तुकानी नगर सर्कल येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालवतांना मिळून आली. यावेळी त्यांच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवाना नसल्याचे समजले.

याप्रकरणी दोन्ही अलपवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना दुचाकी चालविण्यासाठी देणाऱ्या पालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 च्या कमल 3,5, 199 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी दिली.

काय कारवाई झाली

1) अल्पवयीन चालवीत असणारे वाहन जप्त झाले.

2) या अल्पवयीन मुलांना 25 व्या वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करू नयेयासाठी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.

3) जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा परवाना 1 वर्षांसाठी रद्द करण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.

पोलिसांच्या सूचना

पालकांनी अल्पवयीन मुलांना किंवा वाहनाचे मालकांनी आपले वाहन अल्पवयीन मुलांना तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्यासाठी देऊ नये असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे, दिपक गबदुले, होमगार्ड सोनवणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments