इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : पुण्यातील अल्पवयीन मुलाकडून झालेल्या हिट अॅण्ड रनच्या घटनेत दोघांना जीव गमवावा लागल्यानंतर शहर पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. विनापरवाना वाहन चालविणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांच्या पालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. लोणी काळभोर वाहतूक शाखेकडून मंगळवारी (ता. 09) मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे – सोलापूर महामार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक नियमन करीत होते. यावेळी वाहतूक सुरळीत करीत असताना तीन शाळकरी मुले वेगवेगळी दुचाकी घेऊन जाताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता तिघांकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच कागदपत्रे आढळून आली नाहीत.
दरम्यान, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे वय हे कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन शाळकरी मुलांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, हवालदार बजरंग धायगुडे, चेतन सुलाखे व विकास ओहाळ यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.