Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपार्सलमध्ये मेफेड्रॉन सापडल्याची घातली भीतीः अन् तरूणीला घातला 18 लाखांचा गंडा;...

पार्सलमध्ये मेफेड्रॉन सापडल्याची घातली भीतीः अन् तरूणीला घातला 18 लाखांचा गंडा; तर हॉलमार्किंग दुकानातून 13 लाखांचे दागिने चोरीला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याची भीती घालून सायबर चोरट्यांनी तरूणीला केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. तिच्या बँक खात्याचा तपशील घेउन इस्टा लोनद्वारे तब्बल 18 लाख 45 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी स्वप्ना यादव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्ना कुटूंबियासह हडपसर परिसरात राहायला असून, त्यांनी मुंबई-तैनात असे एक पार्सल पाठविले होते. याप्रकरणी सायबर चोरट्यांनी त्याची माहिती घेउन त्यांना फोन केला. मुंबई नाकटिक्स विभागातून बोलत असल्याचे सांगून तूमच्या पार्सलमध्ये एमडी असल्याचे सांगितले. तसेच केस करण्याची धमकी देउन, बँक खात्याचा तपशील घेतला. त्याद्वारे इन्स्टा लोण घेउन स्वप्ना यांची तब्बल १८ लाख ४५ हजारांची फसवणूक केली आहे.

साडेतेरा लाखांचे दागिने चोरीला

पुणे शहरातील मध्यवर्ती रविवार पेठेतील हॉलमार्किंग दुकानातून चोरट्यांनी १३ लाख ४९ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना न्यू त्रिशुल हॉलमार्किंग सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी सुलभा माने (वय ४८, रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत माने यांच्या मालकीचे न्यू त्रिशुल हॉलमार्किंग सेंटर आहे. त्याठिकाणाहून चोरट्यांनी एक मे रोजी रात्री १३ लाख ४९ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments