Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून दोघांची ३१ लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून दोघांची ३१ लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मुंबई क्राइम ब्रांच ऑफिसर बोलत असल्याचे भासवून तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत, असे सांगून फसवणूक केल्याच्या दोन घटना येरवडा आणि सिंहगड रोड परिसरात घडल्या आहेत. तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर अमली पदार्थ सापडले आहे, असे सांगून सायबर चोरट्यांनी दोघांना तब्बल ३१ लाख २१ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले आहेत.

पहिल्या घटनेमध्ये सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञाताने २ नोव्हेंबर २०२३ रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबई ते तैवान पार्सल पाठवले आहे, त्यामध्ये अमली पदार्थ आहे. सायबर क्राइम मुंबईमधून हर्षवर्धन नावाचे अधिकारी बोलत असल्याचे भासवून बँक खाते व्हेरिफाय करावे लागेल असे सांगितले. त्यासाठी एक लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्याने सायबर चोरट्यांना फिर्यादींच्या मोबाइलचा रिमोट अॅक्सेस मिळाला आणि २७ लाख ९८ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेण्यात आले.

दुसऱ्या घटनेमध्ये, येरवडा परिसरात राहणाऱ्या एकाने फिर्याद दिली आहे. मुंबई येथून थायलंडला तुमच्या नावे पार्सल पाठवले आहे. त्यामध्ये अमली पदार्थ असल्याने अटक होईल अशी भीती दाखवली. मुंबई क्राइम ब्रांच ऑफिसर नरेश गुप्ता बॅनर्जी बोलत असल्याचे सांगून खोटी कागदपत्रे पाठवली. त्यानंतर केस क्लिअर करून देतो, असे सांगत एनओसी सर्टिफिकेटसाठी ३ लाख २६ हजार रुपये पाठवण्यास भाग पडले.

अशी घ्या काळजी?

– तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.

– असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.

– कोणतेही अॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये.

– कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments