Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत 21 लाखांचा गंडा: फसवणुकीसह आयटी कायद्यांतर्गत गुन्हा...

पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत 21 लाखांचा गंडा: फसवणुकीसह आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तुमच्या नावाने मुंबईवरून तैवान येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्याच्या कल्याणी नगर भागात घडला आहे.

याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिनेश दामोदर नारखेडे (वय 47, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यानेतुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये 250 ग्रॅम ड्रग्स आहेत. ते पार्सल फेडेक्सच्या मुंबई क्राईम ब्रांच मध्ये असल्याचे सांगितले. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच सायबर सेलला तक्रार करा. तुमचा कॉल मुंबई येथे सायबर सेलला जोडून देतो सांगून डीसीपी बोलत असल्याचा बनाव केला. तसेच मोहम्मद मलिक नावाचा व्यक्ती तुमच्या नावे बँक अकाउंट वापरात असल्याचे सांगितले. खाते व्हेरिफाय करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेऊन 30 लाख 36 हजार 699 रुपये पाठवण्यास सांगितले. त्यापैकी 9 लाख 48 हजार 746 रुपये परत पाठवून फिर्यादीची एकूण 20 लाख 87 हजार 953 रुपयांची फसवणूक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम पुढील तपास करत आहे.

घरफोडीत 2 लाखांचा ऐवज चोरीला

फ्लॅट उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने घरातून 2 लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना एरंडवणा परिसरातील उषा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका वृद्ध नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह एरंडवणा परिसरातील उषा अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. 24 जानेवारीला त्यांचा फ्लॅट उघडा होता. त्यावेळी चोरट्यांनी घरात शिरून तब्बल 2 लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनिरीक्षक पंकज पवार पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments