इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाला १३ लाख ४८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना दि. २४ मे ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हडपसर परिसरात घडली आहे. या प्रकरणी सतीश रासकर (वय ४९, रा. हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रासकर हे हडपसरमध्ये राहायला असून, आरोपीसोबत त्यांची ओळख झाली होती. २४ मे २०२४ रोजी त्यांना आरोपींनी पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखविले. त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, तरच नोकरी मिळेल असे सांगितले. नोकरीसाठी रासकर यांनी रक्कम आरोपीच्या बँक खात्यात वर्ग केली. वेळोवेळी रक्कम जमा करीत तब्बल १३ लाखांवर रक्कम जमा केल्यांनतरही त्यांना नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याप्रकरणी रासकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत.