Monday, April 28, 2025
Homeक्राईम न्यूजपाण्याचं संकट : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पाण्याचं संकट : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाण्याच संकट ओढावल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी पुण्यासह पिंपरी- चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पंपिंग व विद्युत विषयक तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारीही कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे.

गुरुवारी नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत सर्व प्रमुख पाण्याच्या टाक्या, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड, लष्कर जलकेंद्र, होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्र. 1 व 2, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल.आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शहरातील गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुर्युगी टाकी परिसर तसेच कोंढवे धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर येथील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments