Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपाच घरफोडी गुन्हे उघडकीसः अट्टल घरफोड्यास जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून 300 हून अधिक...

पाच घरफोडी गुन्हे उघडकीसः अट्टल घरफोड्यास जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून 300 हून अधिक सीसीटीव्हींची तपासणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहर परिसरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी 35 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तब्बल तीनशेहून अधिक सीसीटीव्हींची तपासणी केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

सुदर्शन विष्णूकांत चंद्रपाटले (वय ३०, रा. मावळ, मूळ, रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नकूतेच भारती विद्यापीठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी रस्ता, सोपानकाका नगर, गणेश चौक परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांचे चोराच्या मागावर होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. त्यावेळी एकजण संशयितरित्या थांबल्याचे दिसून आले. अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे यांनी संशयीत आरोपीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून माग काढला.

राजगुरूनगर, लोणावळा, वडगाव मावळपर्यंत सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर संशयीत आरोपी हा वडगाव मावळ भागात असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून 56 ग्रॅम वजनाचे 1 लाख 27 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. तर, भारती विद्यापीठ, चतुः श्रृंगी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. सहायक पोलीस आयुक्त नंदीणी वग्यानी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे निरीक्षक मंगल मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, सचिन सरपाले अभिनय चौधरी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments