इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लाहोर : पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवादी एअरबेसवर घुसले आहेत. भीषण गोळीबार सुरु आहे. संपूर्ण शहरात भय आणि दहशतीच वातावरण आहे. तहरीक ए जिहाद पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रात्री 2 वाजता पंजाब प्रांतातील मियांवली एअरबेसवर हा दहशतवादी हल्ला झाला. “आमचे आत्मघातकी दहशतवादी मियांवली एअरबेसमध्ये घुसले. त्यांनी अनेक छोटी-मोठी विमान नष्ट केली. अनेक पाकिस्तानी सैनिक आणि पायलट यांचा या • हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी एअर फोर्सची तीन फायटर जेट्स जाळली आहेत..