इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : एकीकडे पुण्यात दहशत, खुनाच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढलेल्या असताना आता चोरीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. आता कर्वेनगरमधुन असाच एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका जेष्ठ महिलेचे खुलेआम मंगळसूत्र चोरून नेण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला आहे.
अधिक माहिती अशी की, कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे पहाटे फिरायला जाणाऱ्या जेष्ठ महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. चोरटे एका गडीवरून दोन महिलांच्या दिशेने गेले, एका महिलेचं मंगळसुत्र हिसकावून घेतलं. मात्र हिसकावून घेत असताना मंगळसूत्राचा अर्धा भाग तुटून खाली पडला. महिला जमिनीवर पडली असता चोरटे पळता भुई झाले. परंतु चोरट्यांनी गाडी परत फिरवून पडलेला मंगळसूत्राचा भाग उचलून घेतला आणि पळ काढला.
यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणेकरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे असं सर्वसामान्य पुणेकरांचं म्हणणं आहे. यामुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहे.