Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पहाटे दीड तास वाटाघाटी, सरकारचा 3 कलमी प्रस्ताव फेटाळून जरांगे पुण्यात; क्युरेटिव्ह...

पहाटे दीड तास वाटाघाटी, सरकारचा 3 कलमी प्रस्ताव फेटाळून जरांगे पुण्यात; क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुनावणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

महायुती सरकारने मांडलेला तीनकलमी प्रस्ताव मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पहाटे फेटाळला आणि ते पुण्याच्या दिशेने निघाले. हा प्रस्ताव घेऊन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय मंगळवारी मध्यरात्री रांजणगाव येथे आले होते. अडीच तास प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना जरागेंची वेळ मिळाली. पहाटे ४ वाजता चर्चेला सुरुवात झाली. दीड तास हे अधिकारी जरांगेंकडे प्रस्तावाचा तपशील मांडत होते आणि मुंबईचा दौरा टाळा, असा आग्रह धरत होते. पण जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिष्टाईसाठी आलेले सरकारी प्रतिनिधी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बाहेर पडले.

दरम्यान, मुंबईत मंगळवारपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी जमण्यास बंदी घालण्यात आली असून ही जमावबंदी १५ दिवसांची असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत असलेले जरांगे यांचा मोर्चा मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रांजणगाव परिसरातील मैदानावर आला. त्यानंतर सव्वादोन ते सव्वातीन वाजेपर्यंत त्यांनी सभेतून मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा विभागीय आयुक्त आर्दड व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे त्यांची वाट पाहत होते. अधूनमधून ते मोबाइलवरून मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करत होते. तेव्हा मुंबईकर अधिकारी त्यांना ‘चर्चेतून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करा’ असे बजावत होते.

अखेर पहाटे चार वाजता जरांगेंच्या मुक्कामस्थानी असलेल्या बंगल्यात अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. सरकारशी संवाद साधून पुन्हा चर्चेस येऊ, असे सांगत ते बाहेर पडले.

जरांगेंनी काय प्रत्युत्तर दिले: अधिकाऱ्यांना म्हणाले की, कुणबी नोंद सापडलेल्या ५४ लाख जणांना आणि त्यांच्या सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र दिले पाहिजे. सर्वेक्षणाचे काम सुरूच ठेवा. क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणीने न्यायालयीन लढाई सुरूच राहील. पण त्याआधी सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे.

क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर बुधवार, २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. ती याचिकाही जून २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर शासनाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सुनावणी होत आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत २४ हजार

मराठवाड्यामध्ये आतापर्यंत २४ हजार कुणबी जातीची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले असून या नोंदींच्या आधारे आगामी काळात अंदाजे १० लाख कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळू शकतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

सदावर्ते यांच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठात सुनावणी :

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यास मूळ खंडपीठाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी नकार दिला (नॉट बिफोर मी) आहे. ही याचिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली आहे. न्या. मोहिते-डेरे यांनी हे प्रकरण न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. त्यामुळे सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागावी लागणार आहे.

काय होता तीनकलमी प्रस्ताव

सूत्रांनी सांगितले की, दोन्ही अधिकारी वारंवार तीन कलमे जरांगेसमोर मांडत होते आणि मुंबईचा दौरा टाळावा, असा आग्रह धरत होते. ही तीन कलमे अशी :

1. ५४ लाख कुणबींची नोंद सापडली ही सकारात्मक बाब असण्याचे मान्य व्हावे.

2. गावागावामध्ये आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यास पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ही महत्त्वाची घडामोड आहे.

3. क्युरेटिव्ह पिटिशनवर बुधवार, २४ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यातूनच आरक्षणाला दिशा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments