Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपस्तीस वर्षे बरोबर होतो त्याचे काय; अजित पवार यांचा प्रचार केला नसल्याचा...

पस्तीस वर्षे बरोबर होतो त्याचे काय; अजित पवार यांचा प्रचार केला नसल्याचा आरोप अयोग्य – राजेंद्र पवार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : “आम्ही अजित पवार यांचा प्रचार केला नाही, असं अजिबात नाही. पहिल्या निवडणुकीपासून अगदी सायकलवरून आम्ही प्रचार केला आहे. त्यामुळे प्रचारच केला नाही, हा आरोप योग्य नाही,” असे मत ‘बारामती अॅग्रो’चे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

एखाद्या निवडणुकीतच आम्ही नाही; ३५ वर्षातील निवडणुकीत त्यांच्या समवेत असल्याचे काय, असा प्रश्नही त्यांनी केला. सुप्रिया सुळे यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (ता. १९) होणार आहे. या बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते.

राजेंद्र पवार म्हणाले, “गेल्या निवडणुकीत रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उभे होते, त्यामुळे आम्ही तिकडे जोर लावला होता, त्या अगोदरच्या निवडणुकीतही आम्ही गाव ते गाव व घर ते घर असा प्रचार केलेला आहे.”

स्वयंपाक केला सगळ्यांनी मिळून…

नुसती भाषणे देऊन विकास होत नसतो, या सुप्रिया सुळे यांच्यावर होत असलेल्या आरोपावर राजेंद्र पवार यांनी उत्तर दिले. जो विकास झाला जो निधी आला तो एकत्रित होता, त्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाही निधी होताच, कदाचित राज्य सरकारमध्ये असल्याने अजित पवार यांनी अधिकचा निधी आणला असेल हे मान्य आहे.

पण स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला होता, वाढप्याकडे वाढायचे काम दिले होते, वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्याने एकट्यानेच केलाय असा अजित पवार यांचा समज झाला असावा, असा टोला राजेंद्र पवारांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments