इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः राज्यातील तापमानात चढ उतार होताना दिसत आहे. येणाऱ्या दिवसात राज्यातील काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस ढगाळ हवामान असेल. तसेच काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाजा आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होणार आहे.
पुण्यातील तापमानात वाढ
पुण्यातील तापमानात थोडी वाढ झाली आहे. येथे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके असू शकते. येणाऱ्या दिवसात पुण्यातील तापमानात बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं वर्तवली आहे.
सातारा, सांगलीच्या तापमानात घट
साताऱ्यातील कमाल तापमान २ अंशांनी घटले आहे. आज साताऱ्यात निरभ्र आकाश असेल. तेथील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके असू शकते. हवामान विभागानुसार पुढील काही दिवसांत साताऱ्यात ढगाळ वातावरण असेल. सांगलीतील कमाल तापमानात अंशतः घट झाली आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८अंश सेल्सिअस असेल. सांगलीमध्ये निरभ्र आकाश असेल.
सोलापूरात तापमानाचा पारा चढला
सोलापूरमधील तापमान ३८ अंश सेल्सियस एवढे आहे. आज स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. पुढील काही दिवसांत सोलापूरमधील हवामानात घाट होईल. हवानमान विभागानुसार हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमधील तापमानातही स्थिर असल्याचं दिसून येतं आहे. तेथील कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतकं आहे.
हवामान विभागानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शहरांतील तापमानात वाढ होत आहे. मात्र पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती मिळत आहे.