Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज पवना नदीपात्रात दिवसाढवळ्या मातीचा भराव, बिल्डर टाकताहेत राडारोडा; महापालिकेचे दुर्लक्ष

पवना नदीपात्रात दिवसाढवळ्या मातीचा भराव, बिल्डर टाकताहेत राडारोडा; महापालिकेचे दुर्लक्ष

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणारे नदी सुधार प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यातच पवना नदीच्या पात्रामध्ये मातीचा भराव टाकून पात्र अरुंद करण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपळे गुरव येथे मोरया पार्कमध्ये पवना नदीपात्रामध्ये दिवसाढवळ्या मातीचा भराव टाकला जात आहे; मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष आहे.

शहरातून सुमारे २५ किलोमीटर वाहणारी पवना नदी किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी व दापोडी या भागांतून जाते. शहरात वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत चालली आहे. सातत्याने नदीपात्रात मिसळले जाणारे मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक रसायनांच्या पाण्यामुळे नदीची गटारगंगा झाली आहे. असे असताना आता पात्रात भराव टाकून पात्र अरुंद करण्याचे काम सुरू आहे.

पिंपळे गुरव येथील मोरया पार्क परिसरामध्ये सातत्याने हे प्रकार सुरू आहेत. बांधकामाचा राडारोडा व मातीची ट्रॅक्टर व डंपरमधून वाहतूक केली जाते. तो राडारोडा नदीपात्रात; तसेच तीरावर टाकला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस नदीचे पात्र अरुंद होत आहे; मात्र महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण विभाग, राज्य सरकार यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नदीची शुद्धता हरवत चालली आहे.

पूरस्थिती ओढवल्यास काय?

नदीपात्रात भराव टाकल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रातून पाणी बाहेर येऊन महापूर येतो. पवना धरणक्षेत्रात २०१३ मध्ये १४८ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यावेळी शहरात अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले होते. २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्येही पिंपळे गुरव व सांगवीमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.

नदी सुधार प्रकल्पाला ‘ब्रेक’

शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कर्जरोख्यांद्वारे निधी उभा करण्याची घोषणा केली आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. मुळा नदीवरील वाकड पूल ते सांगवी या ८.८० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र अद्याप कामाचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प कागदावर आहे.

कठोर कारवाई कधी?

नदी तीरावर अनेक व्यावसायिक व बिल्डरांनी पूररेषेत अतिक्रमण केले आहे. पात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविले आहे. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे; मात्र महापालिका प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नदीपात्र अरुंद होत आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments