Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजपळसनाथ विद्यालयात लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे कार्यक्रम संपन्न

पळसनाथ विद्यालयात लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे कार्यक्रम संपन्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पळसदेव (पुणे) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी, त्वज्ञ राजकारणी, देशभक्त, संपादक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यदिनानिमित्त आणि लोकशाहीर, लोककवी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील शिक्षकेत्तर सेवक संपत येडे होते. ब्रिटीश राजवटीविरुद्ध आपल्या लेखनीतून भारतीयामध्ये असंतोष निर्माण करत स्वातंत्र्याची प्रेरणा टिळकांनी निर्माण केली. समाजातील कष्टकरी, कामगार, दलित, उपेक्षित वर्गाच्या दुःख, यातना आपल्या लेखनीतून मांडत कथा कादंबरी लोकनाट्य, पोवाडे प्रवासवर्णने आदि विपूल साहित्यसंपदा रचणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विद्यार्थी व उपस्थित शिक्षकांनी विचार व्यक्त केले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, अशोक जाधव, सुरेश बनकर, अविनाश शेलार, संदिप काळे, सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, वृषाली काळे, सुवर्णा नायकवडी, प्रतिभा कांबळे, उज्ज्वला वाघमारे, शुभांगी कोळी, सुदर्शना पवार, कीर्ती गायकवाड, अमृता गवळी, निकिता पवार, प्रियंका ढगे आदिसह शिक्षक शिक्षकेतर, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष पवार यांनी केले तर आभार तानाजी इरकल यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments