Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजपळसदेवच्या शेतकऱ्याची कमाल..! कलिंगडाच्या उत्पादनाने झाला मालामाल

पळसदेवच्या शेतकऱ्याची कमाल..! कलिंगडाच्या उत्पादनाने झाला मालामाल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील पळसदेव (काळेवाडी) येथीलशेतकऱ्याने कालिंगडचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. रामदास दगडू चव्हाण असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दोन एकरामध्ये कलिंगडचे पिक घेऊन केवळ दोन महिन्यात साडेतीन लाखाचा निव्वळ नफा मिळवला आहे. यामुळे ते तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

काळेवडी येथील शेतकऱ्याने फक्त 65 दिवसात साडे पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. रामदास दगडू चव्हाण यांनी पारंपारिक शेतीला बगल देत फळबाग लागवड करून भरमसाठ नफा मिळवला आहे.

ते म्हणाले, योग्य वेळी लागवड, ठिबक सिंचनाचा वापर करून वेळोवेळी खतांचा डोस देऊन पीकाची व्यवस्थित काळजी घेतल्यास जास्त उत्पन्न मिळते. त्यांनी त्यांचे दोन एकर शेतात सिम्बा जातीच्या सुमारे 16 हजार कलिंगडच्या रोपांची लागवड केली होती. ते म्हणाले, सुरुवातीला रोपांसाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च आला. आम्ही पिकाला ड्रीप द्वारे पाणी दिले. त्यासाठी जवळपास 35 ते 40 हजार रुपये खर्च केले. रोप लागवडी पासून ते 2 महीने खत व औषध याचा 2 लाख रुपये एवढा खर्च आला.

दरम्यान, ते म्हणाले शेतकऱ्यांनी ऊसाच्या मागे न लगता पर्याय शोधला पाहिजे. फळबागांमधूनही चांगले उत्पन्न मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments