Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजपळसदेवच्या बालाजी अडवालची राज्यस्तरीय धावणे स्पर्धेसाठी निवड...

पळसदेवच्या बालाजी अडवालची राज्यस्तरीय धावणे स्पर्धेसाठी निवड…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पळसदेव : येथील श्री पळसनाथ विद्यालयाने क्रीडा स्पर्धेतील आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या बालाजी वसंत अडवाल या धावपटूची राज्यस्तरीय शालेय धावणे (रनिंग) स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय रनिंग (धावणे) स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी (पुणे) या ठिकाणी संपन्न झाल्या. (दि. 29 ते 30 ऑक्टोबर 2024) या कालावधीत पुणे अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतर्गत आयोजित विभागीय शालेय धावण्याच्या स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाच्या बालाजी अडवाल या धावपटुने 19 वर्षे वयोगटातून 1500 मीटर (रनिंग) धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच विभागीय स्पर्धेत 6000 मीटर क्रॉस कंट्री रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

शालेय विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून बालाजी अडवाल या धावपटूची राज्यस्तरीय शालेय रनिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यशस्वी धावपटू बालाजी अडवाल आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, सुवर्णा नायकवडी, रामचंद्र वाघमोडे यांचे श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव आदींनी अभिनंदन केले आहे. आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments