Saturday, June 14, 2025
Homeक्राईम न्यूजपर्यटक महिलेचे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला ! कात्रज येथील राजीव...

पर्यटक महिलेचे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला ! कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालय बघायला आलेल्या पर्यटक महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटक महिलेच्या पिशवीतून दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत सारिका अभिमान पवार (वय 27 वर्ष, रा. कावलगाव, ता. धारशिव) यांनी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारी नुसार, फिर्यातदार सारिका या उन्हाळी सुट्टीसाठी पुण्यात नातेवाईंकांकडे राहायला आल्या होत्या. त्या मुलांना घेऊन कात्रज येथील प्राणी संग्रहालयात आल्या होत्या.

प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी असल्याने महिलेचे लक्ष नसल्याची चोरट्यांनी संधी साधत पिशवीची चेन उघडून चोरट्यांनी 1 लाख 49 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. आपल्या पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी प्राणीसंग्रहालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. पोलीस हवालदार निर्मळे तपास करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments