Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजपर्यटकांच्या पदरी निराशा ; पुण्यातील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी...

पर्यटकांच्या पदरी निराशा ; पुण्यातील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी प्रतीक्षा…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी कोट्यवधीचा खर्च करून ही पुन्हा पर्यटकांच्या पदरी निराशा पडली आहे. आतापर्यंत या संग्रहालयासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आल्याने आणखी सव्वा वर्ष हे संग्रहालय खुले होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या नऊ वर्षापासून पर्यटकांसाठी बंद असलेल्या या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयास आणखीन सव्वा वर्ष टाळे असणार आहे. त्यामुळे पर्यटकांच्या पदरी निराशा आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पशु-पक्ष्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये एमआयडीसीच्या सात एकर जागेत १९८९ मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारले. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे २०१६ ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे. आता या संग्रहालय खुले होण्यासाठी आणखीन प्रतीक्षा पर्यटकांना करावी लागणार आहे.

दरम्यान या संग्रहालयाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ३६ प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे आता तिसऱ्या टप्प्यातील कामाला आयुक्तांकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी या संग्रहालयाचे काम पूर्ण होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments