इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड: मागील काही महिन्यापासून बीड राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अश्यातच आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या दाव्यामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेचे केंद्र बनले आहे. परळीमध्ये १०९ अज्ञात मृतदेह सापडले असल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे आता नानाविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
अधिक माहिती अशी की, खासदार सोनवणे म्हणाले, परळीमध्ये १०९ अज्ञात मृतदेह सापडले आहेत. मात्र त्यांचा खून झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, या संदर्भात कोणतीही माहिती नाही. असं खासदार सोनवणे यांनी म्हंटलं आहे. बोलताना ते म्हणाले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील केवळ ४ ते ५ घटना समोर आलेल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात असे १०९ मृतदेह सापडलेले आहेत, ज्यांच्याबद्दल अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाही. या मृतांचा खून झाला आहे की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील राजकारण्यांवर ठपका ठेवला आहे. १०९ मृतदेहांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. या घटनांना जिल्हयाबद्दल असलेली राजकीय उदासीनता जबाबदार आहे. राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने अश्या घटना घडत नाहीत. असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे.