Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपब, बारसह आता रेस्टॉरंटलाही रात्री दीडपर्यंत परवानगी; रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना रात्री ११:३०...

पब, बारसह आता रेस्टॉरंटलाही रात्री दीडपर्यंत परवानगी; रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना रात्री ११:३० पर्यंत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरातील पब, बिअर बार आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंतची वेळ यापूर्वीच ठरवून दिली आहे. परंतु आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांनाही रात्री दीडपर्यंत परवानगी राहील. तर रस्त्यालगतच्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सना रात्री साडेअकरानंतर बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

देशी दारूच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे. त्यांनाही वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, दारूच्या दुकानाजवळ अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपी दारू पितात. त्यामुळे अशा अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्यास प्राधान्य

शहरात रस्त्यावर किरकोळ कारणावरून मारहाणीच्या घटना वाढत आहेत. यापुढे रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘स्ट्रीट क्राईम’ आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना यापुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments