Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी घेतला बावनकुळेंचा समाचार

पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी घेतला बावनकुळेंचा समाचार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: महाराष्ट्रात पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली आहे. पाणी पाजणाऱ्यांच्या गोष्टी एकल्या होत्या पण आता चहा पाजण्याचे पहिल्यांदाच ऐकले आहे. असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.

देशातील पहिल्या महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अर्थात लोकमत ‘ती’ चा गणपती मंडळाला मंगळवारी सकाळी खा. सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संपादक संजय आवटे, वृत्तसंपादक सचिन कापसे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजकारणी आणि पत्रकाराचं आगळ वेळ प्रेमाचं नात असतं. कधी खट्टा कधी मिठ्ठा असतं. विरोधात लिहिल तर हा असं का लिहितोय. चांगल लिहिल तर तो हुशार पत्रकार आहे अस बोललं जात. राजकारण आणि पत्रकारिता एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

तिचा गणपती उपक्रम कौतुकास्पद

बदलत्या काळात वर्तमानपत्राला खूप महत्व आहे. आजही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाला सुरुवात होत नाही. दिवसेंदिवस ऑनलाईचे प्रमाण वाढत चालले आहे. ऑनलाईन बातमीची हेडलाईन आणि बातमी याचा काहीही संबंध नसतो. हा संपूर्ण जगाचाच प्रश्न आहे. असो, ऑनलाईनमुळे तात्काळ बातमी वाचायला मिळते हे खरं आहे. १० वर्षानंतर वर्तमानपत्र असेल की नसेल हे माहित नाही पण काळानुरुप बदलायला हवं. गेली १० वर्षे लोकमतचा ती चा गणपती हा सुरु असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments