Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपत्नीला पळवून नेलेल्या तरुणाच्या अल्पवयीन भावाचे बारामतीतून अपहरण

पत्नीला पळवून नेलेल्या तरुणाच्या अल्पवयीन भावाचे बारामतीतून अपहरण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : बारामती तालुक्यात पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून ज्या तरुणाने पत्नीला पळवून नेले आहे, त्याच्या अल्पवयीन भावाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना ६ जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती तालुक्यातील पिंपळी गावात घडली.

याप्रकरणी बाबासो लक्ष्मण पवार (वय-49, धंदा-नोकरी, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रताप सुभराव जाधव (सध्या रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे, मुळ रा. मोराळे, ता. तासगाव, जि. सांगली) याच्यावर रजि नं. 507/2024 भारतीय न्यायसंहिता कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पिंपळी येथून फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी प्रताप जाधव याच्या पत्नीला काही दिवसापूर्वी पळवून नेले आहे. याचाच राग मनात धरून जाधव याने फिर्यादी यांच्या दुसऱ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केले होते. जोपर्यंत माझ्या पत्नीला आणून सोडत नाही, तोपर्यंत तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी संबंधित युवकाने दिली होती.

या प्रकरणी ८ जुलै रोजी बारामती शहर पोलिस ठाण्यात अपहणाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार करून तपास सुरु केला होता. मात्र, वारंवार लोकेशन बदलून आरोपी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून आरोपीला ताब्यात घेत संबंधित अल्पवयीन मुलाची शिताफीने सुटका केली.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, शहरचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके व कुलदीप संकपाळ, फौजदार युवराज घोडके, पोलिस हवालदार यशवंत पवार, मोहंमद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments