Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजपताका लावण्यावरून वाद प्रकरणः पर्वती भागातील दंगलप्रकरणी 180 जणांवर गुन्हा

पताका लावण्यावरून वाद प्रकरणः पर्वती भागातील दंगलप्रकरणी 180 जणांवर गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील पर्वती परिसरात नुरानी मशीद परिसरात पताका लावण्यावरून झालेल्या लहान मुलांच्या भांडणानंतर दोन गटांत दगडफेक होऊन सोमवारी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या १६० ते १८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात अगला.

त्यापैकी १२ जणांना पोलिसांनी अटक केली अाहे. गौरव भामरे, अभिजित काळे, अगेम कोलते, अादेश काळे, प्रेम क्षीरसागर, विनय पालखे याचा मोठा भाऊ, अावेज कुरेशी, अफजल अन्सारी, अबुजर कुरेशी व इतर १६० ते १८० व्यक्तींवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत पोलिस शिपाई संजय अात्माराम भरगुडे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती भागात नुरानी मशिदीजवळ व भामरे चौकाकडून नुरानी मशिदीकडे येणाऱ्या रस्त्यावर ३१ मार्च ते १ एप्रिल रोजी रात्री साडेबारा ते सकाळी सव्वासात वाजेपर्यंत हा प्रकार घडला. नुरानी मशिदीजवळील परिसरात ईदच्या पताका लावण्यावरून आधी लहान मुलांमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रित ठेवली. परंतु रात्री साडेबारा वाजता दोन्ही गट समोरासमोर अाले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केली. या वेळी जमावातील काही लोकांनी दगडफेक करून काही वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments