Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत, उद्धव ठाकरेंनी केली 'ही' विनंती; म्हणाले, “त्यांचं स्वागत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत, उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ विनंती; म्हणाले, “त्यांचं स्वागत आहे, त्यांनी..!”

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गट यांनी एकमेकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे व भाजपाच्या राज्यातील नेतेमंडळांबरोबरच मोदी सरकारवरही टीका केली. मनोज जरांगे पाटलांचं बेमुदत उपोषण व मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून विरोधकांसह जरांगे पाटलांनीही सरकारवर हल्लाबोल केला असताना या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विनंती केली आहे.

निळवंडे धरणाचं लोकार्पण

उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचं लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारच्या सुमारास शिर्डीत दाखल झाले. यावेळी इतर कार्यक्रमांबरोबरच मोदींच्या उपस्थितीत एका शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं. यावेळी मोदींसमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

पंतप्रधान आज शिर्डी दौऱ्यावर निळवंडे धरणासह विविध विकासकामांचे लोकार्पण

दरम्यान, मोदींच्या या दौऱ्याविषयी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना विचारणा केली असता त्यांनी मोदींना एक विनंती केली आहे. आज मातोश्रीवर झालेल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे उत्तर देत होते. “पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, “मराठा आरक्षणावर खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“राजकारणाचा खेळखंडोबा झालाय ”

दरम्यान, ठाकरे गटात होणाऱ्या इनकमिंगविषयी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. “आमच्या पक्षातून बाहेर जाणारे सत्तेच्या दिशेनं जात आहेत तर पक्षात येणारे सत्ता आणण्याच्या दिशेनं येत आहेत. काल एकनाथ पवार भाजपामधून आले, आज चंगेज खान आले. येत्या काही दिवसांत आणखी काही जण येतील. राजकारणाचा झालेला खेळखंडोबा कुणालाही पटत नसल्यामुळेच ते येत आहेत”, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments