Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 9 वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? आरटीआयद्वारे माहिती आली...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 9 वर्षांत किती सुट्ट्या घेतल्या? आरटीआयद्वारे माहिती आली समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत किती वेळा सुट्टी घेतली होती? असाच एक प्रश्न आरटीआयद्वारे विचारण्यात आला होता. या आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तरही आले आहे. तर नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. तसेच, गेल्या 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि परदेशात 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याचे म्हटले आहे.

पुण्यातील आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांना आरटीआयद्वारे ही माहिती मिळाली. आयटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) आरटीआयद्वारे माहिती मागवली होती की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून किती दिवस कार्यालयात हजेरी लावली. यावर पीएमओकडून दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत कामावर असतात. पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही.

माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पीएमओचे अवर सचिव प्रवेश कुमार यांनी दिली. पीएमओने 31 जुलै 2023 रोजी हे उत्तर दिलं आहे. दरम्यान, यापूर्वी 2015 मध्येही पीएमओकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत आरटीआयद्वारे उत्तर मागवण्यात आले होते. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुट्टी घेतली नसल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, हा फक्त पहिल्या वर्षीचा आकडा होता. नुकत्याच समोर आलेल्या आरटीआयमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments