Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजपंतप्रधान आवास योजनेसाठी ६ हजार ३९४ जणांचे अर्ज

पंतप्रधान आवास योजनेसाठी ६ हजार ३९४ जणांचे अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : सर्वसामान्य नागरिकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी तसेच वडगाव खुर्द या पाच भागांत ४ हजार १७६ घरे बांधण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यासाठी आजपर्यंत ६ हजार ३९४ जणांचे अर्ज आले आहेत.

शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने वडगाव बुद्रुक, खराडी तसेच हडपसर भागात यापूर्वी २ हजार ९१८ घरे बांधून त्याचे वितरण केले आहे. त्यानंतर

सप्टेंबर २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजना ०.२’ची घोषणा केली.

त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याची सूचना महापालिकेला केली. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. आता, महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली होती. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात धानोरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द, बालेवाडी येथे ही घरे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ४ हजार १७६ घरे बांधण्यासाठी महापालिकेला ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments