Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजपंढरपूर दर्शनाहून परतणाऱ्या बसला अपघात; २१ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

पंढरपूर दर्शनाहून परतणाऱ्या बसला अपघात; २१ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

राजगुरुनगर : खेड तालुक्यात मोफत पंढरपूर यात्रा करून आलेल्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात २१ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खेड तालुक्यात विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराच्या गाडीला हा अपघात झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १) खेड तालुक्यातील आढे गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडला. अपघातातील २१ जणांवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर दर्शन करून यात्रेकरूंना गावोगावी घरी सोडण्यासाठी ही बस आली होती. आढे गावा जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला चिखलात घसरून खड्यात चाक उतरल्याने बस उलटली. बसमधील वीस पंचवीस भाविक आतमध्ये सीटवर तसेच एकमेकांवर आदळून जखमी झाले.

भावी आमदाराची राजकीय वारी

खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकी पुर्वी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, आषाढी वारी सुरू असताना पंढरपूर दर्शनाचा लाभ मतदारांना देण्याचा आटापिटा इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments