Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पंढरपूर, राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालाची धुळवड सुरू आहे. यंदाची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेती होती, त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांनाही निकालाची प्रतिक्षा •आहे. दोन राजकीय पक्षांच्या फुटीनंतर मतदारांचा कौल कोणाकडे आहे हे यावरून स्पष्ट होणार आहे. अशातच पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये (Pandharpur Gram Panchayat) 40 वर्षानंतर सत्तांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिजीत पाटील गटाचे दिपक शिंदे हे विजयी झाले आहे. राष्ट्रवादी एकहाती सत्ता असलेली ही ग्रामपंचायत आता सत्तांतराचा बदल अनुभवणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे गटाला यंदाच्या निवडणूकीत मोठा धक्का बसला आहे.

मतदारांचा कौल शरद पवार गटाला

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर मतदार शरद पार गटाला पाठींबा देतील की अजीत दादांच्या पाठीशी उभे राहतील हे यंदाच्या निवडणूकीत स्पष्ट होणार होते. ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर आज राज्याभरात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अनेक ग्रामपंचायतीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच जाहिर झाला यात मतदारांनी अजीत पवार गटाच्या बबन शिंदे यांना खो देत शरद पवार गटाच्या दिपक शिंदे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे.

बारामतीत दादांचेच वर्चस्व

पवार कुटूंबीयांची ओळख असलेल्या बारामतीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. यंदा बारामतीत अजीत पवार गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला आहे. ही निवडणूक शरद पवार आणि अजीत पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेची होती. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत बारामतीकर कोणाच्या बाजूने उभे राहाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अजीत पवार गटाला मिळालेल्या विजयानंतर राजकारणातले चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे 12 पैकी 12 ग्रामपंचायतींवर अजीत पवार गटाने विजय मिळवला आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments