इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पंजाब अँड सिंध बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड सिंध बँकेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत १५८ रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त शेवटचे २ दिवस उरले आहेत. करिअरची सुरुवात करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी punjabandsindbank.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षे असावी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. १२वीला मिळालेले गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आणि इंटरव्यू घेतला जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.