इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गाडेला अटक केल्यानंतर त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टामध्ये दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. तरुणीवर अत्याचार झाला नसून संमतीने दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले असा दावा दत्ता गाडेच्या वकिलांनी केला आहे. यामुळे दाव्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
आरोपीच्या वकिलांचा ‘दावा’ काय?
त्या दोघांमध्ये ‘जे झालं ते दोघांच्या मर्जीने झालं आहे, असं आरोपीचं म्हणणं आहे. ती मुलगी स्वतःहून गाडीमध्ये गेली होती, त्यानंतर आरोपी गेला. या प्रकरणी मी बलात्कार केला नाही, असं आरोपीचं म्हणणं आहे. त्या दोघांच्या संमतीने संबंध प्रस्थापित झाल्याने याला बलात्कार म्हणता येत नाही. ऊच्च न्यायालयाने दिलेल्या निकलानुसार संमतीने प्रस्थापित झालेले शारिरिक संबंध बलात्कारामध्ये मोडत नाहीत. असा जोरदार युक्तीवाद आरोपी दत्तात्रय गाडे याचे वकील साजीद शाहा यांनी केला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, ही घटना घडली तेंव्हाची वेळ ५.४५ ही होती. म्हणजे ही घटना दिवसा घडली. मात्र पीडितेने कुठेही आरडाओरडा करून लोकांना बोलावलं नाही. दोन वेळा बलात्कार झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे तर तिला आरडाओरडा करता आला असता. मात्र जे झालं ते संमतीने झालं आहे. समतीने झालं नसतं तर महिलेने आरडा ओरडा केला असता. ती रहदारीची जागा आहे. तेथे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत’, असा युक्तीवाद आरोपीचे वकील वाजीद खान ८.८. केला आहे.