Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज नोकरीचे आमिषः प्रोसेसींग फी घेऊन सहा तरूणांची फसवणूक; पर्वती पोलीस ठाण्यात दोघांवर...

नोकरीचे आमिषः प्रोसेसींग फी घेऊन सहा तरूणांची फसवणूक; पर्वती पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नोकरीचे आमिष दाखवून प्रोसेसींग फी घेऊन सहा तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्वती पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरण एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत अंकिता सूर्यकांत हगवणे (वय-२४, रा. शिवणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रफीउर एरफान अली मोंडल (वय 29, रा. येवलेवाडी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच इतर दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान सातारा रस्ता येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपींनी स्पिन सोर्स नावाची कंपनी स्थापन केली आहे. नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांना हेरून जॉब प्रोसेसिंग नावाखाली २ ते ५ हजार रुपये फी घेऊन फसवणूक करण्यात येत होती. फिर्यादी अंकिता हगवणे यांनी नोकरीसाठी जॉब है आणि वर्क इंडिया या मोबाईल अप्लिकेशनवर रिझुम अपलोड केला होता. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना इंटरव्हूसाठी बोलावण्यात आले. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमध्ये बँके ऑफिस मध्ये डेटा एंट्रीचे काम असून त्यासाठी २३ हजार पगार मिळेल.

तसेच या जॉबच्या प्रोसेसिंगचे 2 हजार 800 रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. यानंतर फिर्यादी यांनी ऑनलाईन पद्धतीने हे पैसे भरले आणि जॉइनिंग लेटर देण्यात येईल देण्यात असे सांगण्यात आले. मात्र फिर्यादी यांनी जॉइनिंग लेटर न देता उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येत होती. यानंतर फिर्यादी यांनी जॉबसाठी भरलेली प्रोसेसिंग फी परत मागितली असता ती दिली नाही. यावेळी फिर्यादी इतर ५ ते ६ जणांची प्रोसेसिंग फीच्या नावाखाली १ लाख २१ हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस कांबळे करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments