Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedनिष्ठावंतांच्या लढाईत संजय जगताप विजयी होणार : खासदार अमोल कोल्हे

निष्ठावंतांच्या लढाईत संजय जगताप विजयी होणार : खासदार अमोल कोल्हे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी राजांनी महाराष्ट्राला निष्ठावंत कसा असतो हे दाखवून दिलं. खरी निष्ठावंतांची लढाई ही महाराष्ट्रात लढत असताना संजय चंदूकाका जगताप हे निष्ठावंत असल्याचे पुरंदर हवेलीला चांगलेच नेतृत्व माहिती आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना विधानसभेवर आमदार म्हणून आपण सर्वांनी निवडून द्यावे. निष्ठावंतांच्या लढाईत संजय जगताप यांच्या पाठीशी पुरंदर हवेलीच्या जनतेने खंबीरपणे उभे राहावे, अशी स्पष्ट भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांची सासवड शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. कोल्हे यांनी व्हिडिओद्वारे पुरंदर हवेलीतील मतदारांशी संपर्क साधला. यावेळी जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सासवड नगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, विविध संघटनाचे पदाधिकारी, सासवड येथील नागरिक उपस्थित होते.

जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय नागरिकांनी एकमताने घेतला आहे. दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांचा विकासाचा वारसा संजय जगताप समर्थपणे चालवीत आहेत. मतदारसंघात मागील पाच वर्षे लोकप्रतिनिधी आणि त्याआधी अनेक वर्षापासून विविध संस्थात्मक सामाजिक लोकप्रतिनिधी म्हणून केलेली विकास कामे गावो गावात त्यांनी निर्माण केलेला संपर्क यामुळे पद यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न समोरच्या उमेदवाराकडून केला जात आहे.

सासवड येथे लोकनेते शरद पवार यांच्या भाषणातील अर्धवट मजकूर प्रसारित करून एक उमेदवार सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहे. मात्र पवार साहेबांनी तुमची माजी सर्व शक्ती आमदार संजय जगताप यांच्या पाठीशी उभी करून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे स्पष्ट आव्हान केले आहे. त्यामुळे याचा पुरंदर हवेलीतील निष्ठावंत कार्यकर्ते असे मतदार आमदार जगताप यांच्याच पाठीशी ठामपणे उभे आहेत. असे प्रचार प्रमुख सुदाम इंगळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments