Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजनिलेश राणेंवर पुणे महापालिका मेहरबान; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य

निलेश राणेंवर पुणे महापालिका मेहरबान; कमीचा धनादेश स्वीकारत थकबाकी केली शून्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे– हॉटेल कर थकबाकीप्रकरणी भाजप नेते निलेश राणे यांना पुणे महापालिकेकडून दिलासा मिळाला आहे. निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश पुणे महानगरपालिकडे जमा केला आहे. त्यानंतर त्यांची थकबाकी शून्य करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी त्यांची थकबाकी शून्य करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

निलेश राणे यांची डेक्कन परिसरात व्यावसायिक जागा आहे. या जागेसाठी पुणे महापालिकेने ३ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचं जाहीर केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत त्यांची मालमत्ता सील केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राणेंच्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते. निलेश राणेंकडून थकबाकीची वसुली करण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती.

३ कोटी ७७ लाख थकबाकी

३ कोटी ७७ लाख थकबाकी असताना निलेश राणे यांनी २५ लाखांचा धनादेश पुणे महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेने यासंदर्भात सांगितलं की, उर्वरीत मालमत्तेप्रकरणी वाद सुरु आहे. त्यामुळे सध्या मिळकत कर शून्य करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने पुणे महानगरपालिकेने मंगळवारी राणेंच्या हॉटेलला सील ठोकली होती. शिवाजीनगर विभागाच्या हद्दीत डेक्कन कॉर्नर येथे राणेंच्या मालकीचा मॉल आहे.

या मॉलची एकूण पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी एक कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी संबंधितांनी भरली. त्यानंतर वरच्या दोन मजल्यांची तीन कोटी ७७ कोटी थकबाकी भरावी यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पण संबंधितांकडून त्यास दाद दिली नव्हती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या पथकाने ही मिळकत सील केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments