Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजनिर्वाण विद्यापीठाकडून खामगाव टेकच्या निलेश थोरात यांना संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएचडी प्रदान

निर्वाण विद्यापीठाकडून खामगाव टेकच्या निलेश थोरात यांना संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएचडी प्रदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : एमआयटी आर्टस् डिझाईन अँड टेकनॉलॉजी विद्यापीठ, स्कूल ऑफ कॉम्पुटिंग कार्यरत असलेले व खामगाव टेक (ता. हवेली) येथील संगणक अभियांत्रिक विभागाचे प्रा. निलेश कमल नामदेव थोरात यांना निर्वाण विद्यापीठाची पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. डॉ. अमित सिंगला आणि डॉ. तानाजी धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इबेड्डेड विस्युअल क्रिपटोग्राफी फॉर सीक्रेट इमेजेस शेरिंग थ्रू स्टॅम्पपिंग अँड ओटीपी प्रोसेस, या विषयावर संशोधन करून शोध प्रबंध सादर केला.

निर्वाण विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. एस एल गोदरा आणि प्रा. डॉ. राजेश कासवान, यशवंत सहकारी कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, खामगांवटेकचे सरपंच मारुती थोरात, टिळेकरवाडीचे सरपंच गणेश टिळेकर, चनेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष कांतीलाल थोरात, टिळेकरवाडीचे पोलीस पाटील विजय टिळेकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विलास थोरात, जेष्ठ नेते आणासो थोरात, मा. उपसरपंच शालन थोरात, सारिका थोरात, पोलीस पाटील तनुजा थोरात यांनी प्रा. निलेश थोरात यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments