Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरु; उत्पादन शुल्क विभागाचा दहा हॉटेल, पबला दणका

नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरु; उत्पादन शुल्क विभागाचा दहा हॉटेल, पबला दणका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल व पबला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दणका देण्यात आला आहे. परवाना देताना घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या विविध भागांतील १० हॉटेल, पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

विमान नगर येथील लेमन ग्रास रेस्टॉरंट, शिरूर येथील हॉटेल काकाज, कल्याणी नगर येथील अॅनोनियम कॅफे, हॉटेल ट्वीन स्टार, बॉलर्स, कोरेगाव पार्क येथील हॉटेल फूशन, मेट्रो लाउंज, नारंग पार्क, प्लॅज, आर्यन बार अँड ग्रील असे कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल, पबची नावे आहेत.

शहरात हायप्रोफाईल हॉटेल, पब, रूफटॉप बारची संख्या मोठी आहे. हॉटेल, पब यांना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिले जाते, मात्र रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, पब सुरू ठेवण्यात येतात. गेल्या आठ दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.

“राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मागच्या आठ दिवसांत नियम मोडणाऱ्या पुण्यातील १० हॉटेल व पबवर कारवाई करण्यात आली आहे. – चरणसिंग रजपूत, अधीक्षक – राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग’

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments