Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजनाशिकात रक्तरंजित थरार; जुन्या वादातून धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला, एकाचा जागीच मृत्यू

नाशिकात रक्तरंजित थरार; जुन्या वादातून धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला, एकाचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, अत्याचार, हाणामारी अशा गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता नाशिक रोडच्या जेलरोड भागात दोघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथील जेलरोड भागातील मोरे मळा, बालाजी नगर येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (१ मे) रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. जेलरोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे. रितेश डोईफोडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जुन्या भांडणातून झालेल्या या हल्ल्यानंतर हल्लेखोर आरोपी स्वतः नाशिकरोड पोलिसात आल्याची माहिती आहे. नाशिकात वारंवार गुन्ह्याच्या घटना घडत असल्याने नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नाशिकच्या जेलरोड मोरे मळा येथील राहणारा निलेश पखळे याचा अवैध दारू विक्रीचा धंदा होता. जेलरोड महाजन हॉस्पिटल मागे राहणारा रेकॉर्ड वरील सराईत आरोपी रितेश डोईफोडे हा नेहमी निलेश पेखळे याच्याकडे पैशांची मागणी करत राहायचा. गुरुवारी रात्री रितेश हा निलेश पेखळे यांच्या घरी आला आणि त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. तसेच, त्याने निलेश पेखळे याला पैशांसाठीही दमदाटी केली. या दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की निलेश पेखळे याने शस्त्राने हितेश याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर जोरदार वार केले.. त्यातच रक्तबंबाळ झालेल्या हितेशचा मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments