इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नाशिक : नाशिक शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. सिडको परिसरात एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याची घटना आघाडली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सोन्याच्या दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. दोन बंदूकधारी दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. यानंतर कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरी केली आहे.
दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात दरोडा..
दरोडा टाकल्यानंतर दोघेही दरोडेखोर दुचाकीवर पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून नाशिक पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. भर दिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा पडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.