Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजनारायणपूर येथे उत्सव मुर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान; दत्त जयंती सोहळ्याचा समारोप

नारायणपूर येथे उत्सव मुर्ती व पादुकांना चंद्रभागा स्नान; दत्त जयंती सोहळ्याचा समारोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बापू मुळीक / सासवड नारायणपूर येथे १३ डिसेंबर रोजी सुरु झालेल्या दत्त जयंती सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी पोपट महाराज टेबें स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा झाली. तसेच चंद्रभागा कुंडाचे पुजन होऊन त्यानंतर उत्सव मुर्ती व पादुकांना विधीवत स्नान घालण्यांत आले. या वेळी “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”चा जय घोष करण्यात आला.

दत्त जयंती सोहळ्याचा शेवटच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता मंदिरात आरती करून उत्सव मुर्ती व पादुकांना फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यांत आले. त्यानंतर मंदिरातुन पालखीने ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवेले. पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या वेळी तुतारी व दिगंबराच्या गजराने सारा परिसर दुमदुमून गेला.

मिरवणुकीत पालखी पुढे छबिणे, ढोल-लोझीम पथक, बँड पथक, भजन पथक आदींचा यात सामावेश होता. तसेच पताका, अबदागिरी समावेत भगव्या वेशातील सेवेक-यांमुळे सारा परीसर भगवामय झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नगरपालिका, विदयुत मंडळ, एस.टी. सेवा, आरोग्य सेवा, प्रशासकीय अधिकारी याची तहसिल कार्यालय, पंचायत समिती, सेवा चांगली मिळाली.

मिरवणुक ११ वाजता चंद्रभागा कुंडावर आल्यावर तेथे फुलांनी सजविलेल्या ओट्यावर पालखी विसावली. पोपट महाराज यांचे हस्ते विविध तिर्थक्षेत्राहुन आणलेले पाणी चंद्रभागा कुंडात सोडुन त्यानंतर फुले, पुष्पहार, ओटी, फळे अर्पण करून त्याची पुजा करण्यांत आली. उत्सव मुर्ती व पादुकांना चंद्रभागास्नान घातल्या नंतर विधीवत पुजन करण्यात येऊन पुन्हा उत्सव मुर्ती व पादुकांना पालखी ठेवण्यांत आले. पालखी वाजत गाजत मंदिरात आली. मंदिरात पोपट महाराज यांचे प्रवचन होऊन आरती झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments