Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज नामांकित कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोगः उच्चशिक्षित चोराने 17 मोबाईल चोरी करून...

नामांकित कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोगः उच्चशिक्षित चोराने 17 मोबाईल चोरी करून केले विक्री, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील मागील काही दिवसात मोबाईल चोरीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका मोबाईल चोरीचा तपास करताना शिवाजीनगर पोलिसांनी एका उच्चशिक्षित चोरट्याला गजाआड केले आहे. संबंधित आरोपीने तब्बल 17 मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकित कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग केल्याचा प्रकार चौकशीत उघडकीस आल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल व शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

ओंकार विनोद बत्तुल (वय 22, रा. नाना पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी ओंकार बत्तुल याचे बीएस्सी पर्यंत शिक्षण झालेले आहे. टेक महिंद्रा कंपनीतून 4 महिन्यापूर्वी त्याने काम सोडले होते. त्यामुळे तो बेकार होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे हद्दीत जुना तोफखाना भागातील एका फर्निचरचे दुकानातून चार जानेवारी रोजी दुकानदार कामात व्यस्त असताना, त्याच्या काऊंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती.

त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मोबाईल चोऱ्यांना प्रतिबंधीत करण्यासाठी व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याकरिता प्रयत्न करत होते. त्यावेळी चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबऱ्या मार्फत पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने सदरचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

त्यामुळे पोलीसांनी आरोपीकडे आणखी सखोल तपास केला असता, नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीचे मोबाईलच्या मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची पीडीएफ तयार करुन, तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवून मोबाईल दुकानदारास बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधारकार्डच्या आधारे विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपीने गुन्हयातील विक्री केलेला मोबाईल व इतर अशाप्रकारे चोरी केलेले एकूण 17 मोबाईल पोलीसांनी जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले इतर मोबाईल संर्दभात तपास सुरु आहे. मोबाईल खरेदी – विक्री करणाऱ्या दुकानदारांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी विक्री करताना, मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments